मुंबई - आगामी निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा राम मंदिराचा मुद्दाही तापायला लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राममंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच संघाने आता देशभरामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर हुंकार रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात नागपूरमधून होणार आहे.
मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार राम मंदिराच्या मुद्द्यावर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हुंकार रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून याची सुरुवात होणार असून त्यानंतर बेंगळुरू, नवी दिल्ली याठिकाणीही हुंकार रॅलींचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment