0

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम केले तर जनता नेहमीच पाठराखण करते. विकासाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या कसोटीला उतरा. औंधची विकासकामे करण्यासाठी मी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले.

औंध ग्रामपंचायतीतर्फे 14 व्या वित्त आयोगातून शालेय विद्यार्थीनींना सायकल, महिलांना शिलाई मशीन, चष्मे वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.

समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, आब्बास आत्तार, चंद्रकांत कुंभार, शंकरराव खैरमोडे, इलियास पटवेकरी, सरपंच नंदिनी इंगळे, उपसरपंच सचिन शिंदे, बापूसाहेब कुंभार, राजेंद्र माने, आनंदा रणदिवे, हणमंतराव खैरमोडे, दिपक देशमुख, रमेश इंगळे, वैशाली यादव, भाग्यरेखा गोसावी, सुरैय्या शेख, मालती पवार, स्वाती मेळावणे, रोहिणी थोरात, चाँदशा काझी,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

गायत्रीदेवी म्हणाल्या की ग्रामपंचायतीला थेट निधी उपलब्ध होत असल्याने विकासाची कामे करताना आता अडचणी निर्माण होणार नाहीत. परंतु मिळालेल्या निधीतून लोकांच्या हितासाठी कामे करा. कोणी काही म्हटले तरी माझी बांधीलकी येथील जनतेशी आहे. आणि जनतेला विकासकामांचा दिलेला शब्द मी पाळणार आहे. यापुढील काळातही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी असलेल्या विविध योजना गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी   19 सायकल, 19 शिलाई मशीन, 260 लोकांना मोफत चष्मे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. करण्यात आले.

हणमंतराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक चांदशा काझी यांनी आभार मानले.


Post a Comment

 
Top