: कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे आडात पडून बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.बामणवाडी येथे वस्तीलगत असलेल्या सुमारे पाच फुट व्यासाच्या आडातील पाण्यावर हा बिबट्या मृतावस्थेत तरंगत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. गावातील अशोक देसाई यांनी या आडावरती घरगुती वापरासाठी पाण्याचा पंप बसविला आहे. ते त्या आडावरती नेहमीप्रमाणे गेले असता, त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.बिबट्याने या आडातून बाहेर पडण्याची खूप धडपड केल्याचे लक्षात येते. तथापि रात्रीच्या अंधारात तो पडला असावा, त्यामुळे त्याला वा
चविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.

Post a Comment