0
  • Maratha Reservation Action Report Tabled In Maha Assemblyमुंबई - मराठा समाजासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दिवशी बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाचा कृती अहवाल (एटीआर) आणि विधेयक अखेर विधानसभेत सादर केला. या विधेयकाला कुठल्याही चर्चेविना सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुद्धा एक दिलाने एकत्रित येऊन मंजुरी दिली. आता हेच विधेयक विधान परिषदेत सादर करण्यात आले. तेथे देखील या विधेयकाला मंजुरी मिळाली. यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी होणार आहे. ही स्वाक्षरी सुद्धा आजच करण्यात यावी अशी मागणी आझाद मैदानावर बसलेल्या आंदोलकांनी केली आहे.
    सर्वपक्षीय बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचेही आभार मानले. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांना 1 डिसेंबर रोजी जल्लोषासाठी तयार राहा असे सांगितले होते. त्यांचे हेच आश्वासन तारखेपूर्वीच प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून येत आहे.
    अहवाल मांडताच विरोधकांनी यावर चर्चेपूर्वी अभ्यासासाठी वेळ मागितला. सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी 2 तासांची विनंती केली. या विनंतीचे विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांनीही स्वागत केले. दुपारी ठीक 1.30 वाजता यासंदर्भातील विधेयक सुद्धा सादर करण्यात आले. त्याला आता सरकारने मंजुरी दिली.
    उल्लेखनीय बाब म्हणजे, मराठा आरक्षणावर मागास वर्गाचा कृती अहवाल राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूर केला. कृती अहवालात मराठ्यांना SEBC अर्थात सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या अहवालातील सर्वच तरतुदी सरकारने मान्य केल्या.

Post a Comment

 
Top