मुंबई - रिपब्लिक पक्षाचेप्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही विषयावर बोलताना ते काहीही हातचे ठेवून बोलत नाहीत, असे म्हणतात. अगदी राजकीय भूमिकाही ते कशाचाही विचार न करता थेट विविध व्यासपीठांवर स्पष्टपणे मांडत असतात. असेच काहीसे त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमातही केले. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, आगामी निवडणुकीत कोणाबरोबर जायचे हे मी हवा कोणाची आहे, याचा अंदाज घेऊनच करेल.
काय म्हणाले रामदास आठवले..
रामदास आठवले एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नसीम खानही व्यासपीठावर होते. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, नसीम खान म्हणत आहेत की, तुम्ही आमच्याबरोबर या. पण मी 10-15 वर्षे काँग्रेसबरोबर होतो. आता इकडेही मला 15-20 वर्षे राहावे लागेल. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत मी इथे राहील. जेव्हा मला अंदाज येईल की हवा कोणत्या दिशेला आहे, तेव्हाच मी याबाबत निर्णय घेईल.

Post a comment