प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांचे जीवन ‘डिकोडिंग शंकर’ या लघुपटातून दाखविण्यात आले आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आपले मन काय सांगते ते ऐकणे महत्वाचे आहे, हेच लघुपटात सांगण्यात आले आहे, अशी माहिती ‘डिकोडिंग शंकर’ च्या दिग्दर्शिका दिप्ती सीवन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इफ्फीत दिप्ती सीवन दिग्दर्शित ‘डिकोडिंग शंकर’ व प्रबल चंक्रबोर्ती दिग्दर्शित ‘संपुरक’ या दोन लघुपटाचा समावेश आहे. गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत सीवन बोलत होत्या. सीवन म्हणाल्या, की आपली आवड लक्षात घेऊन ती उत्कृष्टपणे सादर केली तर यश नक्कीच मिळते.
डिकोडिंग शंकर या लघुपटात ज्येष्ठ संगीतकार व गायक शंकर महादेवन यांचे जीवन चरित्र आहे. देशातील सर्वच भाषांध्ये त्यांनी संगीत दिले आहे. त्यांचे जीवन चरित्र पाहून युवक नक्कीच प्रेरित होतील.
प्रबल चंक्रबोर्ती म्हणाले, की समाजातील बंधनाना सांभाळून महिला आपल्या आवडी निवडी कशा जपतात याचा प्रवास ‘संपुरक’ हा लघुपट सांगतो. महिला आपले व्यवस्थापन कशा पध्दतीने करतात यावर लघुपट आधारित आहे.

Post a Comment