0
जीआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील इंडिया इनोव्हेशन चॅलेंज कॉटेस्टंमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांना 20 लाख रूपयांचे अनुदानही केंद्र सरकारकडून मिळाले. यामध्ये देशभरातील 5 हजार हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी आगीत अडकलेल्या जखमींना त्यांना ह्यदयाच्या ठोकापासून शोधून काढण्याची यंत्रणा शोधून काढली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या विद्यार्थ्यांनी आपली सेल्सस ही कंपनी काढून त्याच्या माध्यमातुन त्यांनी हा प्रकल्प केला आहे. यामध्ये यश तेंडोलकर, शर्मद तडकोडकर, कार्तिक कुलकर्णी, अभिषेक श्रेयेकर यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. त्याला जीआयटी कॉलेजचे मोठे सहकार्य मिळाले आहे. बेंगळूर येथे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांना स्टार्टअप इंडिया या प्रकल्पाला हे अनुदान देण्यात आले आहे.
‘फायर फाईट असेट’ असे या प्रकल्पाचे नाव असून मायक्रोव्हेव बेस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर जीवंत मनुष्य कोठे आहेत हे पाहण्यासाठी संपूर्ण परिसरातचा शोध घ्यावा लागतो. यासाठी या विद्यार्थ्यांनी 20 ते 25 मीटर भागातील जखमींना शोधण्यासाठी या यंत्राचा वापर करण्यात आला आहे. याचे पेटंटही या विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. यामध्ये अजुन बदल करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या विद्यार्थ्यांना प्रा. उत्तम देशपांडे, प्रा. प्रविण कालकुंद्री, डॉ. संतोष सराफ, डॉ. विणा देसाई व गौरव कामत यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन यु. एन. कालकुंद्रीकर, प्राचार्य डॉ. ए. एस. देशपांडे यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top