0
नाशिक, 23 नोव्हेंबर एम जी रोडवरील कृष्णा साडी सिल्क दुकानाजवळ तिघा संशयितांनी जुन्या वादातून सराईत गुन्हेगार मनीष प्रेमजी रेवर (वय 21) याच्यावर चॉपरने वार करून खून केल्याची घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे एम जी रोड आणि जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष रेवर हा एम जी रोडवरील कृष्णा साडी सिल्क नजीक असताना संशयित चेतन लेवे, किशोर बरु याच्यासह तिघांनी त्याचावर जुन्या वादातून हल्ला चढवला. संशयितांनी मनीषवर चॉपरने वार केले असता त्याने तेथून पळ काढला मात्र संशयितांनी त्याचा डेरीडॉनपर्यंत पाठलाग करित वार केले. गंभीर जखमी झाल्याने तो जागीच मृत झाला. संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. 
मनिषला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात पाठवले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भद्रकाळीचे मंगलसिग्न सूर्यवंशी, सरकारवाड्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात नातलगांनी गर्दी केल्याने तणावाची परिस्थिती होती. 
मृत मनीष रेवर याने गेल्या वर्षी वेदमंदिरासमोर गॉगल विक्रेत्याचा खून केला होता तसंच त्याच्यावर मारहाण, दुचाकी चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. तर संशयितही सराईत गुन्हेगार आहेत. रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाशिक : सपासप चाॅपरने वार करत पाठलाग करून गुंडाला ठार मारलं

Post a Comment

 
Top