0
मुंबई :  राठी प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता. त्या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज आठवडा झाला आहे. तो सिनेमा म्हणजे झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे प्रस्तुत 'नाळ'. सुधारकर रेड्डी दिग्दर्शित नाळ हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अगदी सातच दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे. 
सर्वत्र हाऊसफुल्लचा बोर्ड लावत या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात करोडोंची कमाई केली असून विक्रम रचला आहे. नागराज मंजुळे म्हटलं की सिनेमा इतिहास रचणार यात शंकाच नाही आणि पुन्हा एकदा ते अधोरेखित झालं आहे. 'नाळ' या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 14 करोड रुपयांची कमाई केली असून विक्रम रचला आहे. 
श्रीनिवास पोकळेने चैत्याची भूमिका इतकी सुंदर निभावली आहे की, प्रत्येकाला ती आपलीच कथा वाटत आहे. लहान मुलाचं भावविश्व सुधाकर रेड्डीच्या या कथेत आहे. त्याला नागराज मंजुळेने जोडलेले संवाद अतिशय मनाला भावतात. आई आणि मुलाला जोडणारी 'नाळ' इतक्या प्रभावीपणे या सिनेमात मांडली आहे की प्रत्येकाला त्याचं वेगळेपण अधोरेखित झाल्या शिवाय राहत नाही. 'नाळ' सिनेमाचा पहिल्याच आठवड्यात विक्रम

Post a comment

 
Top