- रियाद- सौदी अरेबियामध्ये एका महिलेला फाशीची शिक्षा सुनवल्यानंतर जगभरात या निर्णयाची निंदा केली जात आहे. आपल्या मालकाचा खुन केल्याप्रकरणी तिला ही शिक्षा देण्यात आली आहे. पीडित महिला इंडोनेशियाची रहिवासी असून, तिचा मालक जेव्हा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करत होता तेव्हा स्व:चे रक्षण करताना त्याचा खुन झाल्याचे तिने सांगितले.
8 वर्षांपूर्वी घडली होती घटना> ही घटना इंडोनेशियायी महिला तुती तुर्सिलावटीची आहे. ती सौदी अरेबियाच्या थॅफ शहरात घरकाम करत होती. साल 2010 मध्ये या महिलेच्या हातून तिच्या मालकाचा खुन झाला होता.
> महिलने सांगितल्यानूसार, मृतक तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करत होता. त्यावेळी स्व:ताचे रक्षण करत असताना त्याचा मृत्यू झाला. परंतू न्यायालयाने तिची कोणतीच बाजू ऐकून न घेता फाशीची शिक्षा जाहीर केली.
> जुन 2011 मध्ये तुतीला मालकाचा खुन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्या प्रकरणावरून 20 ऑक्टोबरला तिला फाशीची शिक्षा सुनवण्यात आली. तुतीला ही शिक्षा मक्का राज्यातील थॅफ शहरात सुनावली गेली जिथे ती वास्तव्यास होती. शिक्षा सुनवल्यानंतर तिचे कुटूंब तिला भेटण्यासाठी तिथे पोहचले.
> या प्रकरणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुतीच्या शिक्षेची कोणतीच माहीती सौदी अरेबियाकडून इंडोनेशिया सरकारला देण्यात आली नाही. या प्रकरणाबद्दल इंडोनेशिया सरकारने आपला विरोध दाखल केला आहे. या प्रकरणानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले असल्याचे कळते.
> इंडोनेशिया सरकारने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही सौदी अरेबियाच्या विदेशमंत्र्यांना विचारले होते की, तुतीला शिक्षा देण्याअगोदर आम्हाला पुर्वसूचना का देण्यात आली नाही? या प्रकरणावरून इंडोनेशियाच्या एक पार्लमेंट मेंबरने सांगितले की, सौदी अरबियाने मानव अधिकाराचे सगळे सिद्धांत दुर्लक्षीत केले आहे. ज्यामध्ये सगळ्यांना मिळणारा जगण्याचा अधिकार देखील आहे.स्वत:ची अब्रू वाचवली, पण महिलेला सौदीच्या न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment