0
न्यायालयात चालणार्या गुह्याचे तपासादरम्यान राहणार्या त्रुटीबाबत अवगत करुन, त्या कशा पध्दतीने टाळता येतील. गुन्हा घडलेपासून गुह्याची माहिती फिर्यादी दाखल झाल्यापासून तपासातील प्रत्येक गोष्ट जशी फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, जबाब, तपास टिपणे आदी लवकरात लवकर घेवून ते घटना नेमक्या व मोजक्या शब्दात नोंद कराव्यात, असे विधीज्ञ शिवाजीराव राणे यांनी दोषसिध्दी प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितले.
येथील पोलीस मुख्यालयात शाहुवाडी पोलीस उपाधिक्षक कार्यालयातंर्गत पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी व कॉन्स्टेबल याची एक दिवसाची दोषसिध्दी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख याच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे,पोलीस उपाधिक्षक (गृह) सतीश माने जिल्हा सरकारी अभियोक्ता व्ही.एच.शुक्ल, ऍड. शिवाजीराव राणे, ऍड. अनुराधा देसाई, ऍड. सुजाता इंगळे, उदयसिंह जगताप, सायबर सेलचे उपयुक्तता अमित सर्जे, पोलीस उपाधिक्षक आर.आर. पाटील आदी उपस्थितीत होते.
यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा सरकारी अभियोक्ता व्ही.एच.शुक्ल, ऍड. शिवाजीराव राणे, ऍड. अनुराधा देसाई, ऍड. सुजाता इंगळे, उदयसिंह जगताप, सायबर सेलचे उपयुक्तता अमित सर्जे आदीनी गुह्याचा तपास करताना घ्यावयाची दक्षता, भारतीय पुरावा तसेच तांत्रिक पुरावा, गुह्याच्या न्यायालयात सुनावणी सुरु असताना साक्षिदार, पंच व सरकारी अभियोक्ता याच्या सोबत तपासी अधिकार्यांचे समन्वय असणे गरजेचे आहे. अपघाताच्या गुह्याबरोबर लैंगिक अत्याचार , गर्दी मारामारी अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे स्वागत व आभार पोलीस उपाधिक्षक आर.आर.पाटील यांनी मानले.  

Post a Comment

 
Top