मॉस्को / नवी दिल्ली - रशियातील राजधानीत शुक्रवारी बहुराष्ट्रीय अनौपचारिक शांतता चर्चा आयोजित करण्यात आली. यामध्ये भारत, पाकिस्तान आणि चीनसह तालिबानी शिष्टमंडळाचा देखील समावेश आहे. रशियाकडून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत भारत आणि तालिबान एकाच व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाच्या बहुराष्ट्रीय बैठकीत 9 नोव्हेंबर रोजी तालिबान येणार असल्याची माहिती आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे.
अफगाणिस्तानात शांततेला प्राधान्य
भारत या बैठकीत सहभागी होत असून देशाचे नेतृत्व अफगाणिस्तानात भारताचे राजदूत राहिलेले अमर सिन्हा करत आहेत. त्यांच्यासोबत भारताचे पाकिस्तानातील माजी राजदूत टीसीए राघवन यांचाही समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच भारत दौरा केला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये या बैठकीची रूपरेषा ठरवण्यात आली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, "अफगाणिस्तानात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी भारताचा पाठिंबा आहे. यातून अफगाणमध्ये स्थैर्य, सुरक्षितता आणि विकासाला गती मिळेल." भारताने तालिबानसोबत होणाऱ्या शांतता चर्चेत अनौपचारिकरित्या सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आह
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment