0
दरवर्षीप्रमाणे यंदाही आस्था सामाजिक संस्था व सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा येथे शहर व परिसरातील कचरा वेचकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ‘स्वच्छ सातारा सुंदर सातारा’ या संकल्पनेचे खरे शिलेदार जर कोण असतील तर हे कचरा वेचक. ज्यांना ‘स्वछतादूत’ असे संबोधने योग्य ठरेल. दैनंदिन दिनक्रम न चुकवता आपल्यासाठी झटत असणाऱया हातांना प्रेमाची आपुलकीची ऊब आस्था विविध मान्यवर प्रतिष्ठीत पाहुण्याच्या उपस्थितीत देत असते.
यावेळी वित्तविभाग मंत्रालय उपसचिव वैभव राजेघाडगे,  सातारा नगरपरिषद मुख्याधिकारी शंकर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विजयकुमार निंबाळकर यांनी कचरा वेचक यांच्यासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती विषद केली. वैभव राजेघाडगे यांनी मार्गदर्शन करताना कचरा वेचकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आरोग्य विमा, महात्मा फुले जन स्वास्थ्य योजनांची माहिती दिली. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण व त्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यासाठी कचरा वेचक व आस्था संस्थेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, कचरा वेचकाना सातारा नगरपरिषदेच्या वतीने कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यामध्ये आरोग्य तपासणी करणे यासोबतच  कचरा डेपो येथील नव्याने सुरु होणाऱया प्रकल्पात समाविष्ट करून घेणार असल्याचे ही सांगितले. 

Post a Comment

 
Top