पाडलोस येथे भर वस्तीमध्ये सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक पट्ठेरी वाघ समोर आल्याने कार चालकाची तारांबळ उडाली. चार चाकी वाहन असल्यानेच आतील पिता–पुत्र बचावले. या घटनेने बांदा–शिरोडा मार्गाने रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करणे जीवावरचे संकट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी रात्री शेर्ले येथील बाबूलाल रखांगी हे कारने मुलासोबत रेडी येथे गेले होते. रात्री ते शेर्ले येथे परतत असताना पाडलोस मंदिराजवळ आल्यावर त्यांना रस्त्यावर कुठला तरी प्राणी बसल्याचे निदर्शनास आले. कार जवळ आल्यावर तो पट्टेरी वाघ असल्याचे त्यांनी पाहिले. हा वाघ कारच्या दिशेने रोखू
न पाहत होता. या प्रकाराने घाबरलेल्या चालकाने जीव मुठीत घेऊन कार कशीबशी पुढे नेली. मात्र याच क्षणी दुचाकीस्वार असता, तर त्याच्या जीवावर बेतले असते. बांदा–शिरोडा मार्गावर दिवस–रात्र मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असते. शिवाय गोव्याला नोकरीनिमित्त जाणारेही अनेकजण रात्री–अपरात्री या मार्गावरून प्रवास करीत असतात. त्याचबरोबर मनुष्यवस्तीचा हा भाग असल्याने स्थानिक ग्रामस्थांनाही धोका पोहोचू शकतो.

Post a comment