आयनॉक्सच्या आवारात उभारलेल्या ‘फूड कोर्ट’ मध्ये गोवन फिशकरी राईस प्लेटचा दर चक्क २५० रूपये आणि पेयजलाच्या बाटलीचा दर ५० रूपये ठेवण्यात आल्याने इफ्फीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या देश-विदेशनिधी नाराजी व्यक्त करीतआहेत. इफ्फीच्या ठिकाणी चांगल्या चित्रपटांचा आस्वाद घेताना भूकेच्यावेळी आयनॉक्सच्या पार्किंग शेजारी उभारण्यात आलेल्या ‘फूडकोर्ट’कडे प्रतिनिधींची पावले वळतात. मात्र, या ठिकाणी १०-१२ अन्न व पेय स्टॉल्सवरील दराचे फलक पाहताच अनेकांनी शेजारील मार्केटच्या बाजूला असलेल्या हॉटेल्सकडे जाणे पसंत केले आहे.गोव्यात आल्यावर गोमंतकीय मासळीच्या थाळीची चव चाखणारे खवय्यांचे येथील ‘फिशकरी राईस प्लेट’चे दर पाहून तोंडचे पाणी पळाले. या थाळीसाठी २५०रु. घेतले जात असून त्यात गोमंतकियांना साजेशे अन्नही दिले जात नाही. या थाळीत लहानशा सुरमईचा तुकडा असून त्यालाही शिळा वास येत होता. राज्यात मासळीची टंचाई असल्याची माहितीनसणार्या प्रतिनिधींनी मासळी ताजी नसल्याची तक्रार करूनही त्याकडे कानाडोळा केला जातआहे. या थाळीतील कोबीची भाजीही ताजी नसल्याने बेचव लागत असल्याची तक्रारी ही अनेकांनी काही प्रतिनिधींला सांगितले.
चिकन, मटणच्या सर्व प्रकारच्या डिशेस२०० रु. च्या घरात, तर सुरमई, कोळंबी, पापलेटच्या डिशेसना ३००रु. आसपास दर ठेवण्यात आले आहेत. इफ्फीच्या बाहेरबाजारात व दुकानात १० ते १५ रुपयात मिळणारे सामोसा, वडापाव, कचोरी आदी पदार्थ येथील स्टॉल्सवर ५० रु. दराने विकले जात आहेत. साध्या पाण्याची बाटली, लिंबूपाणी आदीलाही ५० रु. दर लावला गेलाआहे. गोव्यातील प्रसिद्ध ‘रस्सा आम्लेट’ जे रस्त्यावरील गाड्यावर ४० रुपयांत मिळते त्यासाठी चक्क १०० रु. फेडावे लागतात.हॉटेलात सुमारे ३० रु. प्लेट मिळणारेअळंबीचे ‘तोंडाक’ला चक्क १५० रु. दर ठेवला गेला आहे.
चढ्या दरामुळे जवळील हाॅटेलकडे आेढ
बंगाल येथून आलेल्या रिशभ शुक्ला यांनी आयनॉक्स फुड कोर्टमधील अन्नपदार्थांच्या दरांबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले, की आपण गेली ५ वर्षे न चुकता इफ्फीसाठी गोव्यात येतो. आपण चित्रपटाबरोबर गोमंतकीय जेवणाचा आस्वादही घेतो. मात्र, या जेवणाचे दर माफक प्रमाणात असण्याची अपेक्षा आम्ही ठेवतो. इफ्फीच्या आवारात मिळणारे महागडे खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या बाजारातील हॉटेलात १०० रूपयांत रूचकर जेवण मिळते. मात्र, घाईगडबडीत आयनॉक्सच्या शेजारी असलेल्या फुडकोर्टमध्ये आलेल्या प्रतिनिधींना फलकावरील महाग दर पाहूनच बाहेर पडावे लागत आहे. इफ्फीच्या आयोजकांनी या गोष्टीचीदखल न घेतल्यास त्यांचे नाव देशभरखराब होण्याचा धोका आहे.

Post a Comment