0

50 व्या भागात मोदी म्हणालेआवाज माझा, पण त्यातील भावना देशवासीयांच्या                                    

  • News about narendra modi man ki baat programme
    नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ च्या ५० व्या भागात लोकांना संबोधित केले. त्यात मोदी म्हणाले की, “जेव्हा मी ‘मन की बात’ सुरू केली होती तेव्हा त्यात राजकारण, सरकारची स्तुती नसावी आणि मोदीही नसावा, असे मी ठरवले होते.” मोदी यांनी काही युवकांनी उल्लेख केलेल्या ‘लेक्सिकल स्टडी’चा (बोललेल्या शब्दांचा अभ्यास) हवाला दिला, ज्यात मन की बातच्या अनेक भागांत असंख्य विषयांवर अभ्यास करण्यात आला आणि हा कार्यक्रम राजकारणापासून दूर आहे, असा निष्कर्ष त्यातून निघाला.
    मोदी म्हणाले, मोदी येईल आणि जाईल, पण हा देश आपली एकता आणि स्थायित्व कधीही जाऊ देणार नाही. मोदी म्हणाले की, “भारताचा मूळ आत्मा राजकारण किंवा राजशक्ती नाही, तर सामाजिक मूल्ये आणि समाज आहे. वास्तविकपणे राजकारण हा सामाजिक जीवनाच्या इतर पैलूंपैकी एक आहे. राजकारण वरचढ ठरले तर ती व्यवस्था समाजासाठी चांगली नाही. ‘मन की बात’ची थट्टाही उडवली जाते, पण हा कार्यक्रम सरकारबद्दलचा नाही, तर तो समाजाबद्दलचा आहे. तो आकांक्षापूर्ण आणि महत्त्वाकांक्षी भारताला संबोधित करतो. या कार्यक्रमात आवाज माझा असतो, पण वास्तवात उदाहरण, उत्साह आणि भावना देशवासीयांच्या असतात. आकाशवाणी म्हणजे दूरसंचारचा सर्वात शक्तिशाली स्रोत, त्यामुळेच मी ‘मन की बात’ साठी आकाशवाणीची निवड केली.”
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गुरू नानक यांचे केले स्मरण
    मोदी म्हणाले की, उद्या (२६ नोव्हेंबरला) राज्यघटना दिवस आहे. ज्यांनी आपली राज्यघटना तयार केली त्या महापुरुषाची आठवण करण्याचा दिवस. हे महापुरुष म्हणजे पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पुढील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये आपण शीख धर्माचे गुरू नानक देव यांचे ५५० वे प्रकाश-पर्व साजरे करणार आहोत. सरकारने त्याच्या भव्य आयोजनासाठी विशेष व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. करतारपूर कॉरिडॉरबाबत मोदी म्हणाले की, या कॉरिडॉरमुळे आपल्या देशातील लोक सहजपणे पाकिस्तानमधील करतारपूरमध्ये गुरू नानक देव यांच्या पवित्र स्थळापर्यंत जाऊ शकतील.
    देशातील युवकांकडे वाया घालवण्याएवढा वेळ नाही
    मोेदी म्हणाले की, युवक खूपच उत्साही, नवोन्मेषी आणि फोकस्ड असतात. मन की बातच्या माध्यमातून मी युवकांचे प्रयत्न, त्यांच्या गोष्टी जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. युवक खूप प्रश्न विचारतात, अशी तक्रार नेहमीच होते. मी म्हणतो की, त्यांना संशोधन करायची इच्छा आहे, हे चांगलेच आहे. अनेक लोक म्हणतात की, युवकांकडे संयमच नाही, पण मी म्हणतो की, त्यांच्याकडे वाया घालवण्यासाठी वेळच नाही.

Post a Comment

 
Top