0
श्रीराम जवाहर शेतकरी साखर कारखाना आगामी हंगामात 5 लाख में टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निचितच पूर्ण करणार असून इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला दर देण्याचा प्रयत्न करणार आहे. अडचणीतून बाहेर निघणाऱया श्रीरामला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग यांच्या तेराव्या गाळप हंगामाची शुभारंभ त्यांच्या हस्ते कारखानास्थळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सभापती रामराजे म्हणाले, इथेनॉल प्रकल्प हा एकमेव नफ्यात चालणारा उद्योग आहे, त्यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरून त्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे. यंदा पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. 
प्रास्ताविकामध्ये कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे म्हणाले, यंदा पाच हजार मेट्रिक टन ऊस गाळप उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 3300 टन प्रतिदिन या सरासरीने कारखाना चालविण्यात येणार आहे. 8026 हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीसाठी 2650 रुपये अंतिम जर देण्यात आलेला आहे.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, दादाराजे खर्डेकर, तसेच जवाहर कारखान्याचे अप्पासाहेब गोटखिंडे, कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, माजी सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरध्यक्ष मिलिंद नेवसे कारखान्याचे संचालक, सभासद आदी यावेळी उपस्थित होते.
 

Post a Comment

 
Top