नाशिक-शिर्डी - श्री साईबाबांच्या समाधीवर अर्पण झालेल्या फूल, पुष्पहारातील साेनचाफ्याच्या फुलांचा अर्क काढून त्यातून निर्मित सुगंधी तेलाचा वापर करून यंदा साई मंदिर परिसरात हजारो पणत्या यंदा झगमगणार अाहेत.
साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची नुकतीच सांगता झाली. या महत्त्वपूर्ण वर्षात जनसेवा फाउंडेशन अाणि मंदिर विश्वस्त मंडळाने करार करून साई समाधीवर अर्पण हाेणाऱ्या फूल, पुष्पहार यांच्यावर प्रक्रिया करून अगरबत्ती बनवणे सुरू केले. गुलाब, झेंडू अाणि साेनचाफ्याची फुले यांचा समाधीवर अर्पण हाेणाऱ्या पुष्पहारांमध्ये माेठ्या प्रमाणावर समावेश असताे. दरराेज अशा प्रकारे किमान दाेन टन फुले समाधीवर अर्पण हाेत असतात. त्यात सब्बा अाणि साेनचाफ्याच्या फुलांचे प्रमाण ४० टक्के असते. या फुलांवर भाविकांच्या श्रद्धेचा अात्मीयतेने विचार करून प्रक्रिया केली जात असून यापूर्वी गुलाबाच्या फुलांपासून अगरबत्ती, तर झेंडूच्या फुलांपासून चंदनाप्रमाणे टीका तयार करण्यात अाला अाहे, ज्याला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला अाहे.पुष्पहारांत वापरण्यात येणाऱ्या सब्जा अाणि चाफ्याची फुले यांच्यावर प्रक्रिया करून त्याचा अर्क काढून त्यावर यंदाच्या दीपाेत्सवात साई मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करण्याचे नियाेजन जनसेवा फाउंडेशनने केले हाेते. हा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला अाहे.
गावरान, वनस्पती तुपाचा वापर
साेनचाफ्याच्या फुलांचा अर्क काढून ताे वनस्पती तूप अाणि गावरान तूप यांच्यात मिसळून पणत्यांमध्ये भरण्यात येणार अाहे, या सुगंधित तेलावर प्रज्वलित हाेणार असलेल्या हजाराे दिव्यांनी या वर्षी शिर्डीतील साई मंदिराचा परिसर झळाळणार अाहे.साडेतीन हजार पणत्या
आजवर तीन हजारांच्या वर चाफा अर्क तेलाच्या पणत्यांची निर्मिती करण्यात आली अाहे. दिवाळीत या सर्व पणत्या श्री साईबाबांच्या दीपोत्सवासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- शालिनीताई विखे पाटील, मुख्य प्रवर्तक, जनसेवा फाउंडेशन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment