मुंबई- मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन विधानसभेत रणकंदन सुरु आहे. मंगळवारी (ता. 27) मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल पटलावर मांडण्यावरुन चर्चा करण्यात आली. आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. विरोधाकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती आरोप केले. विरोधकांच्या मनात मराठा आरक्षणावरुन काळंबेरं असून समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment