0


मुंबई - अयोध्येत राममंदिर उभारणीची घोषणा चुनावी जुमला असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान देत भाजपला आव्हान देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यास उद्यापासून (ता. २४) सुरवात होणार आहे. 
या दौऱ्यादरम्यान रविवारी होणाऱ्या सभेला तेथील प्रशासनाने परवानगी नाकारल्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता शरयू नदीकिनारी उद्या सायंकाळी पाच वाजता महाआरती करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शरयू तीरावर होणाऱ्या महाआरतीच्या वेळीच महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाआरती करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने राजकीय वातावरण तापवण्याचा; तसेच भाजपपेक्षा आमचेच ‘हिंदुत्व’ प्रखर असल्याचे मतदारांच्या मनावर ठसवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. शरयू तीरावर होणाऱ्या महाआरतीत ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आदी शंभर प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

Post a Comment

 
Top