0
शिक्षक हे समाज घडविण्याचे काम करतात. समाजात त्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. असे असताना चक्क मुख्याध्यापक व शिक्षकांत वादाचा प्रकार घडला. गुरुवारी सकाळी बीईओ कार्यालयानजीक सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत हा प्रकार घडला. दोघांच्या वादामुळे परिसरातील नागरिकांत दिवसभर याच वादाची चर्चा सुरू होती.
याविषयी अधिकम माहिती अशी, येथील बीईओ कार्यालयानजीक सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेत आर. जी. चौगुले या मुख्याध्यापिकापदी कार्यरत आहेत. तर पी. पी. कांबळे हे शिक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी चौगुले व कांबळे यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी कांबळे म्हणाले, मुख्याध्यापिका या अन्य शिक्षकांच्या कामाच्या वेळीच तपासणी करत नाहीत. तर माझ्याच कामाच्या वेळेकडे अधिक लक्ष देतात. अन्य शिक्षकांच्या कामातील चुका टाळून केवळ माझ्याविषयी तक्रारी करतात.
गुरुवारी वाय. के. तोलण्णावर हे शिक्षक उशिरा आले. पण त्यांना मुख्याध्यापिका काहीच बोलल्या नाहीत. पण मला त्या नेहमी त्रास देतात. त्यामुळे मुख्याध्यापिका व कांबळे या दोघांच्यात सुमारे तासभर वाद चालू होता. तसेच रजेच्या बाबतीत देखील मुख्याध्यापिका चौगुले या भेदभाव करतात. तसेच रजांची मोजणी देखील व्यवस्थित करीत नाहीत. एकवेळेला माझ्या बाबतीत दीड रजेचा फरक आला होता. त्याची चौगुले यांनी दखल घेतली नाही. वेळेच्या रजिस्टरवर त्या खाडाखोड करतात हे कांबळे यांनी यावेळी पुराव्यानिशी दाखवत मुख्याध्यापिकांनी सर्व शिक्षकांना समान न्याय द्यावा, असे सांगितले.

Post a Comment

 
Top