श्रीनगर/जम्मू - जम्मूतील सुंदरबनी आणि लालयाली परिसरात पाकिस्तानच्या सैन्याने दुसऱ्या दिवशीही युद्धबंदीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यात लष्कराचा एक जवान शहीद झाला. शनिवारी सकाळी ९.४५ वाजता पाक सैन्याकडून गोळीबार सुरू झाला आणि केरी बटालमध्ये तैनात रायफलमॅन वरुण यांना गोळी लागली. त्यांना तत्काळ अखनूरमधील लष्करी रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली.
दुपारच्या वेळीही पाकच्या सैन्याने सुंदरबनीच्या खौर भागात गोळीबार केला. भारतीय लष्करानेे याला प्रत्युत्तर दिले. याआधी शुक्रवारी अखनूर भागात पाक सैन्याच्या गोळीबारात लष्कराचा पोर्टर ठार झाला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment