0
वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडीमधलीवाडी येथील ओंकार सदानंद कदम (13) या शाळकरी मुलाने राहत्या घराच्या खोलीतील छपराच्या वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केलीही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडलीवडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याच्या रागातून ओंकार याने आत्महत्या केलीअसे पोलीस तपासात समोर येत आहे.
ओंकार हा कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होतात्याच्या वडिलांचा रिक्षा व्यवसाय आहेआपल्या मुलाने खूप शिकून मोठं व्हावंयासाठी अभ्यास करण्यास त्याचे वडील त्याला सांगायचेमात्रत्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेमंगळवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी ओंकारने नेहमीप्रमाणे तयारी केलीसकाळी उठल्यानंतर त्याने आपल्या आईला दुपारसाठी भाजी करण्यास सांगितली होतीत्यानंतर काही वेळातच घरात कोणीही नसल्याचे पाहून त्याने खोली बंद करीत छपराच्या वाशाला दोरीने गळफास लावून घेतलाघटनेची खबर सुभाष रामचंद्र रावराणे यांनी वैभववाडी पोलिसांत दिली.
ओंकारचा स्वभाव मनमिळावू होतात्यामुळे खेळताना त्याच्याभोवती लहान मुलांचा गराडा असे.क्षुल्लक कारणामुळे त्याने आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेअधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

 
Top