0
अंबाजोगाई- काळापैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार हेही आश्वासन लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लबाड व भुलथापा देणारे हे सरकार आहे, अशी अंबाजोगाईतील संघर्षयात्रेत टीका करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी संध्याकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी पाहुणचार घेतला. दिवसभर भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन पाहुणचार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केंद्रात व राज्यात भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही शब्द पाळला नाही, उलट जनतेची फसवणूक केली. अशा परिस्थीतीत शेतकरी, शेतमजुरांना धीर देण्याऐवजी त्यांच्या मढ्यावरील लोणी खाण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह शेतमजूर पूर्णपणे नागावला आहे, अशा शब्दात काँग्रेसने भाजपवर तोंडसूख घेतले.
अंबाजोगाई शहरातील वंजारी वसतीगृहाच्या मैदानावर काँग्रेसच्या संघर्ष यात्रेची सभा गुरूवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती. सभा दुपारी एक वाजता सुरू झाली. त्यामुळे सकाळपासून जिल्ह्यातून आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते ताटकळत बसले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अंबाजोगाईत आल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत झाले. भाषणात दुष्काळावर कोणीही बोलले नाही. 2019 च्या निवडणूक तोंडावर ठेवून ही निवडणुकीची प्रचार सभाच दिसून आली. या सभेसाठी महिला वर्ग हजेरीवर आणल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी खर्गे यांनी हिंदीतून भाषण सुरू करताच काही महिला व पुरूष निघून गेले. जिल्ह्याचे ठिकाण बीड असताना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या आग्रहास्तव ही संघर्षयात्रा अंबाजोगाईत आयोजित करण्यात आली होती. संघर्षयात्रेच्या सभेला जास्तीची गर्दी होणार नाही या भीतीपोटी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या शाळेसह बँकाचे कर्मचारी, यांना कार्यकर्ते म्हणून यात्रेच्या ठिकाणी आणले होते.
पाहुणचार घेतल्याने आश्चर्य
दिवसभर भाजपाच्या विरोधात तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र संघर्ष यात्रेची सभा संपताच अंबाजोगाई येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
अशोक चव्हाणांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले
ऐरवी काँग्रेसमध्ये एकमेकावर टीका करून एकमेकाला पाण्यात पाहणारे सर्वच नेते केवळ ज्येष्ठ नेते अंबाजोगाईत आल्याने व्यासपीठावर दिसून आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी बीड जिल्ह्यातील काँग्रेसला बीड व केज दोन जागा द्यावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी केली. परंतु प्रदेशाध्यक्षांनी दोनच काय जागा मागता तीन जागा देतो तुम्ही Congress Leader Hospitality to BJP leaders House in Beed, Ambajogaiआपसातील गटबाजी विसरा असे म्हणून कान टोचले.

Post a Comment

 
Top