खडेबाजार-शहापूर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका घराचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत भाऊबीजदिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवानेच यात कोणतीही प्राणहानी झाली नाही.
आकाश विठ्ठल सावंत यांच्या घराला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. सावंत हे आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतात. तसेच खालच्या बाजूला ते छोटा व्यवसाय चालवितात. अचानक लागलेल्या आगीने त्यांच्या घरातील सामग्रीने पेट घेतला. त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग वेळीच आटोक्मयात आली आणि अनर्थ टळला. मात्र घरातील रोख रक्कम जळून खाक झाली. तसेच घरात ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे देखील जळून खाक झाली. यामुळे त्या कुटुंबाला धक्का बसला आहे.

Post a comment