- कसोटी मालिकेत विंडिजने भारतासमोर सपशेल नांगी टाकली होती. मात्र वन डे मालिकेमध्ये मात्र भारतासमोर विंडिज फलंदाजांनी आव्हान उभे केले होते. एका सामन्यात विंडिजने मिळवलेला विजय आणि एक सामना टाक करण्यात त्यांना आलेले यश यामुळे त्यांना अंतिम सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी होती. पण भारताने त्यांना यात यश मिळू दिले नाही.
पाचव्या वन डे सामन्यात विंडिजचे नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. पण भारतीय गोलंदाजांनी विंडिजच्या फलंदाजांना मैदानावर टिकूच दिले नाही. विंडिजचा संपूर्ण संघ 104 धावांमध्येच गारद झाला. भारताच्या जडेजाने चार, खलील आणि बुमराहने प्रत्येकी दोन आणि कुलदीपने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताने अवघी एक विकेट गमावत विजयी लक्ष्य गाठले आणि मालिकेवर नाव कोरली. भारताकडून रोहित शर्माने 56 चेंडूत 63 दावा केल्या. अवघ्या 14 ओव्हरमध्ये भारताने विजय साकारला.
कोहली मालिकावीर
विराट कोहलीने संपूर्ण मालिकेमध्ये चांगली फलंदाजी केली. त्याने 5 मॅचमध्ये 151 च्या सरासरीने 457 धावा कुटल्या. यामध्ये त्याचा सर्वाधिक स्कोर 157 धावांचा ठरला. या कामगिरीमुळे विराट कोहली मालिकावीर ठरला. विराट पाठोपाठ भारताच्या रोहित शर्माने 389 धावा केल्या - . तर विंडिजकडून हेटमायरने सर्वाधिक 259 धावा केल्या.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment