मुंबई - 13 जणांचा बळी घेणा-या अवनी वाघिणीच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते वनमंत्री सुधीर मुगंटिवार यांच्या पाठिशी आहे. मात्र विरोधकांचे मुनगंटिवारांवर एकापाठोपाठ हल्ले सुरुच आहेत. नुकताच संजय निरुपम यांनीही मुनगंटिवार यांच्यावर असाच एक आरोप केला आहे. मुनगंटिवार वनमंत्री झाल्यापासून एकूणच वाघ मारण्याच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
नरभक्षक बनलेल्या अवनी वाघिणीला मारल्यानंतर विविध स्तरांतून सरकार आणि मुनगंटिवार यांच्या विरोधात टीका होत आहेत. अवनीला बेशुद्ध करून पकडायला हवे होते, पण तसे न करता तिची थेट हत्या करण्यात आली असा आरोप लावला जात आहे. याच विषयावर मुंबईमध्ये काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत काही प्राणी प्रेमींसह टीव्ही सेलिब्रिटी आणि काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांचीही उपस्थिती होते. यावेळी बोलताना संजय निरुपम यांनी मुनगंटिवार यांच्यावर गंभीर आरोप केले. अवनीची हत्या तर झालीच पण मुनगंटिवार वनमंत्री झाल्यापासून एकूणच वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली असल्याचे निरुपम म्हणाले.

Post a Comment