0
 • जयपूर - अनैतिक संबंधांचा शेवट नेहमीच गुन्हेगारीत होतो याचे आणखी एक उदाहरण राजस्थानात समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका सुनेने आपल्या लग्नाच्या 3 वर्षांनंतर सासऱ्याच्या प्रेमात पडून नात्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. तिने आपल्या पतीचा तर सोडा अवघ्या दीड वर्षांच्या मुलीचा सुद्धा विचार केला नाही. सासऱ्याच्या प्रेमात ती इतकी आंधळी झाली की दोघांनी पळून जाण्याचा योजना सुद्धा आखली होती. परंतु, ऐनवेळी पळून जाणे कॅन्सल करून पतीचा काटा काढण्याचा कट रचला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.


  लग्नानंतर काका सासऱ्यावर जडले प्रेम...
  - जयपूरमध्ये मालमत्ता व्यावसायिक मुकेश सैनी हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी मुकेशची पत्नी पूजा हिला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले. यानंतर तिच्या काका सासऱ्याला सुद्धा चौकशीसाठी बोलवाले. तेव्हा नात्याला काळिमा लावणारे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. 
  - 3 वर्षांपूर्वी पूजाचा विवाह मुकेश सैनी या मालमत्ता उद्योजकासोबत झाला होता. लग्नाच्या दीड वर्षांनंतर त्यांना एक मुलगी झाली. सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु, मुकेश आपल्या बिझनेसमध्ये व्यस्त होत गेला. याच दरम्यान घराजवळच राहणारा काका सासरा राकेश सैनीशी पूजाची मैत्री झाली. काका सासरा राकेश सैनी आणि पूजाच्या वयात जास्त अंतर नव्हते. अवघ्या एका महिन्यातच दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

  यामुळे पळून जाण्याचा प्लॅन केला रद्द
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि राकेश यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पळून जाण्याची तयारी केली होती अशी कबुली दिली. दोघांनी आपल्या नात्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या होत्या. पती घराबाहेर जाताच पूजा राकेशला फोन करून घरी बोलवत होती. दोघांनी एकमेकांसोबत घर सोडून पळून जाण्याचा निर्णय देखील घेतला. परंतु, एक दिवस पूजाने राकेशसोबत चर्चा केली. त्यामध्ये आपण पळून गेल्यास कुटुंबाची प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाही. हे लोक आपल्याला बेदखल करतील असे पूजाने राकेशला सांगितले. यानंतर दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन रद्द केला. परंतु, अवघ्या आठवडाभरात त्याहून भयंकर कट रचला.

  उपवासांची कारणे देऊन पतीपासून राहायची दूर...
  राकेशची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. परंतु, हा संपूर्ण कट पूजाने रचला होता असे त्याने पोलिसांना सांगितले. राकेशसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिने पती मुकेशला दुर्लक्षित करणे सुरू केले. कुठल्याही बहाण्याने किंवा उपवासाची कारणे देत ती आपल्या पतीपासून दूर राहायची. यावरून पतीचा संशय वाढत गेला आणि त्याने काही दिवसांतच वारंवार घरी येणाऱ्या काका राकेशचीही चौकशी सुरू केली. दिवसेंदिवस त्याची शंका वाढत गेली. याच दरम्यान तिने पतीला ठार मारण्याचा कट रचला. गेल्या आठवड्यातच राकेशने मुकेशला एका निर्जन स्थळी भेटीसाठी बोलावले. यानंतर त्याच्या पोट आणि छातीत फुटलेली बिअरची बाटली खुपसून त्याचा खून केला. सुरुवातीला त्या दोघांनी पोलिसांची दिशाभूल केली. परंतु, राकेशची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

  तिने आपल्या पतीचा तर सोडा अवघ्या दीड वर्षांच्या मुलीचा सुद्धा विचार केला नाही.

  • woman fell in love with father in law kills husband in rajhasthan

Post a Comment

 
Top