0
 शिवाजीनगर, ता. सातारा येथे पाणी आणण्यासाठी गेलेला एकजण पाय घसून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दिनकर जगन्नाथ धनवडे (वय ४०, रा. शिवाजीनगर, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, दिनकर धनवडे बुधवारी दुपारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेताच्या शेजारी असलेल्या विहिरीत पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले. त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या. त्यामुळे धनवडे दगडाच्या तोडीला धरून पाणी काढण्यासाठी उतरत होते.
दरम्यान, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले. त्यांना पोहण्यास येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बराच वेळ ते न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर उशिरा कुटुंबीय व ग्रामस्थांना मृतदेह विहिरीत आढळून आला. रात्री उशिरा बोरगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Satara: One killed by drowning in the well in Shivajinagar | सातारा : शिवाजीनगरमध्ये विहिरीत बुडून एकाचा मृत्यू, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Post a Comment

 
Top