परभणी- लातुरमधील निलंगा येेथे जवळपास दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा अहवाल समोर आला आहे. या अपघातास पायलट जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे हेलिकॉप्टर वाट चुकल्याचे समोर आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, रावसाहेब परभणी दौऱ्याच्या वेळी दानवे यांचे हेलिकॉप्टर विद्यापीठात लँड केले जाणार होते. परंतु, पायलटने हेलिकॉप्टर थेट पोलिस मुख्यालयाच्या आवारात नेले. अक्षांश, रेखांश न मिळाल्याने हेलिकॉप्टर आकाशात काही वेळ घिरट्या मारत होते. दरम्यान, दानवेंच्या हेलिकॉप्टरसाठी विद्यापीठात हेलिपॅड तयार करण्यात आले होते. विद्यापीठातील लोकांशी संपर्क झाल्यानंतर पायलटने हेलिकॉप्टर विद्यापीठाकडे वळवले.
Post a comment