0
राजापूर गावाच्या विकासासाठी आपण कायम कटिबध्द राहू अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या सुनिता कचरे यांनी दिली. सुनिता कचरे यांच्या फंडातून राजापूर (ता. खटाव) येथील दत्तनगर विभागात बांधण्यात आलेल्या पाणी साठवण टाकीचा व पाईप लाईन योजनेचा लोकापर्ण सोहळा सौ. कचरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यानिमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 
या प्रसंगी मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र कचरे, सरपंच काकासो डंगारे, राजेंद्र घाटगे, अशोक घनवट. रणजित घनवट, शिवाजी घनवट, आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी सरकार राष्ट्रवादीचेच
सौ कचरे म्हणाल्या, आमदार शशिकांत शिंदे यांच्या फंडातून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाची अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. येणारे सरकार हे राष्ट्रवादीचेच असणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी परस्परातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे.
सूत्रसंचालन रणजित घनवट यांनी अशोक घनवट यांनी आभार मानले. कार्यक्रमास, आप्पासो डंगारे, महादेव घनवट, नारायन घनवट, दीपक घनवट, बळीराम डंगारे, रामचंद्र घनवट, बबन घनवट, विनोद गोडसे, गुरूजीसह सहकार मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Post a Comment

 
Top