एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाविषयी अनेक बातम्या समोर येत आहे. हे लग्न 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरच्या काळात होणार असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. निक आणि प्रियांकाचे लग्न उदयपुरच्या उम्मेद भवनामध्ये होणार आहे. काही दिवसांपुर्वी प्रियांकाची आई येथे आली होती. लग्नाविषयी नवीन अपडेट म्हणजे प्रियांका-नीक वेडिंग वेन्यूपर्यंत चॉपरने पोहोचणार आहेत. लग्नात सहभागी होणारे पाहुणेही जोधपुर एयरपोर्टवरुन चॉपरमध्ये स्वार होऊन डायरेक्ट वेडिंग वेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. पॅलेसमध्ये एक हॅलीपॅडही तयार केला जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, मेवाड हेलिकॉप्टर सर्व्हिसव्दारे प्रियांका-निक आणि तिच्या फ्रेंड्ससाठी सर्व्हिस प्रोव्हाइट केली जात आहे असे कन्फर्म झाले आहे. 29 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबरसाठी चॉपर बुक करण्यात आले आहे. जोधपुर एयरपोर्टवरुन भवन पॅलेसपर्यंत पाहूण्यांना पोहोचवण्यासाठी हे चॉपर 5-6 फे-या मारणार आहे. हे चॉपर बुक करण्यासाठी किती खर्च येतो याविषयी आम्ही कंपनीसोबत बातचित केली. यासोबतच चॉपरमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात हेसुध्दा जाणुन घ्या.

Post a Comment