0
  • Women's World Boxing Competition: In the final of the first tournament,नवी दिल्ली - पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मेरी काेमपाठाेपाठ अाता यजमान भारताच्या साेनिया चहलने महिलांच्या जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला. अाता तिलाही घरच्या मैदानावर गाेेल्डन पंच मारून साेनेरी यश संपादन करण्याची संधी अाहे. 
    साेनियाने करिअरमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग घेतला व थेट अंतिम फेरी गाठली. तिने शुक्रवारी अापल्या ५४ ते ५७ किलाे फेदर वजन गटाच्या उपांत्य फेरीत शानदार विजय संपादन केला. दुसरीकडे यजमान भारताच्या प्रतिभावंत बाॅक्सर सिमरनजित काैरचे अापल्या वजन गटाची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.
    मेरी काेमनंतर साेनिया दुसरी 
    यजमान भारताकडून अाता साेनियाने अंतिम फेरी गाठली अाहे. यामुळे अाता साेनिया ही मेरी काेमनंतर यंदा या स्पर्धेची फायनल गाठणारी भारताची दुसरी बाॅक्सर ठरली. मेरी काेमने गुरुवारी अापल्या वजन गटाचा उपांत्य सामना जिंकला अाणि फायनलमधील प्रवेश निश्चित केला.

    सिमरनजितची झुंज अपयशी 
    भारताच्या सिमरनजितला अापल्या ६४ किलाे वजन गटाच्या उपांत्य सामन्यात अपयशाला सामाेरे जावे लागले. तिला चीनच्या डान डाेऊने पराभूत केले. डानने ४-१ ने सामना जिंकला. यादरम्यान सिमरनजितने विजयासाठी दिलेली झुंज व्यर्थ ठरली. डाेऊने ३०-२७, २७-३०, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, २९-२८ ने विजयाची नाेंद केली.
                                                                                                                               
    साेनियाची अाक्रमक खेळी; सहज जिकंली फाइट
    भारताच्या साेनिया चाहरने अापल्या वजन गटाच्या उपांत्य सामन्यात काेरियाच्या साेन वा जाेला पराभूत केले. तिने ५-० अशा फरकाने ही रंगतदार फाइट जिंकली. तिने अाक्रमक खेळी करताना साेनला जबरदस्त ठाेसे लावले. त्यामुळे तिला शेवटपर्यंत या रिंगमध्ये अापले वर्चस्व अबाधित ठेवता अाले. यातूनच तिला ही फाइट जिंकता अाली. रिंगमधील सरस खेळीमुळे तिला पाच पंचांनी विजयी घाेषित केले. तिने ३०-२७, ३०-२७, ३०-२७, २९-२८, ३०-२७ ने ही फाइट जिंकली. यासह तिला अंतिम फेरी गाठता अाली. पराभवामुळे काेरियाच्या साेनला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.                                                                                                                                        

Post a Comment

 
Top