0
अयोध्या प्रश्नी सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित ठेवली असतानाही या मुद्यावरून हिंदू संघटनांकडून सभांचे सत्र सुरूच आहे. अयोध्येत रविवारी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील २४ नोव्हेंबरला अयोध्येत पोहचणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषत: रामजन्मभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच अयोध्या आणि फैजाबाद येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या सभेला येथील व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यापूर्वीच मोठा झटका बसला असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेला परवानगी नाकारली आहे. राम मंदिर निर्माणावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपल आहे.  

Post a comment

 
Top