0
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून विद्यार्थी व जनतेविरोधी धोरणामुळे सर्वांचे हाल होते आहे. यादिवाळीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व सर्वसाधारण जनता यांच्यावर काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रसंग ओढावला असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या एनएसआयु विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
    भाजप सरकारने युवकांना दिल्या गेलेल्या अच्छे दिनाचे आश्वसन, दोन कोटी युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, 15 लाख रुपये बँक खात्यावर जमा करणार अशा विविध फसव्या घोषणाबाजी करून हे सरकार सत्तेवर आले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व जनतेवर काळी दिवाळी करण्याचा प्रसंग दिवाळीत आला आहे. म्हणून कॉंग्रेस एसएनयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित एकच घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारचा निषेध असो, भाजपामुळे आली पाळी, विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी, स्कॉलरशीप शिष्यवृत्ती, चौकीदार चोर है, नोटाबंदीमुळे 100 हुन अधिक लोकांचा बळी, राफेल घोटाळा, 2 कोटी कधी मिळणाऱ अशा घोषणा लिहलेले फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते. मराठ़ा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देतो म्हणून गाजर दाखविणाऱया सरकारला विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेवर काळी दिवाळी प्रसंग आणणाऱया मुर्दाड भाजपा सरकारची येणारी दिवाळी जनताच काळी करणार आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला. 
   यावेळी  जिल्हाध्यक्ष डोंगरे, तिरुपती परकीपंडला, शुभम माने, मनोज आदटराव, संदेश कांबळे, शिवराज बिराजदार, अनंत म्हेत्रे, रजनीकांत जाधव, अजित पवार, चेतन यादव, निवृत्ती गव्हाणे, श्रीकांत वाडेकर, अमर भोसले, निलेश पाटील, युवराज दोडमनी, सागर भिसे, अरबाज शेख, सुरज होमकर, गौरव बनसोडे, दिनेश डोंगरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top