0
दोन दिवसापुर्वी वडगाव – हातकणंगले रोड झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले अमोल पाटील यांच्यावर कोल्हापूर इथल्या सरस्वती ऍपल मध्ये उपचार सुरू आहेत. अमोलच्या घरची परिस्थिती अंतत्य हलाखाची असून उपचार खर्च सुमारे 5 लाख सांगितला आहे. संकट कशी एकमेंकाचे हात धरून येतात याचाच उदाहरण म्हणावे लागेल. दिवाळी सणाच्या तोंडावर अपघात झाला. उपचारासाठी एवढा खर्च आणायचा कुठून हा प्रश्न कुंटूबाला सतावत आहे. मात्र आळतेमधील काही युवकांनी याच्या खर्चाला हातभार लावायचा असा संकल्प केला आहे.
उपचारासाठी मिळेल तेथून मदत गोळा करत आहे, प्रत्येकानी जर मदतीचा हात दिला तर माणुसकी अजून जिंवत आहे असे वाटेल, नियतीच्या या संकटाला सर्वानी एकत्रीत मदत करून जखमी अमोल पाटील याला यातून बाहेर काढणे क्रमप्राप्त आहे. इचलकरंजी येथील महावीर जैन यांनी 25 हजाराची मदत देवून माणूसकीचा ओलावा जपला त्याच पध्दतीने आपन ही अमोलच्या कुंटूबियांना मदत केली. अनंत उपकार होतील यासाठी प्रमोद जनगोंडा, प्रमोद हावळे, संदिप जनगोडा, अभिजीत कनवाडे हे व इतर युवक रात्रीचा दिवस करून मदत गोळा करीत अमोलला दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून थोडासा हातभार दयावा अशीच भावना नागरिकाची झाली आहे.

Post a Comment

 
Top