0


नवी दल्ली :
भारताला २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात ज्या दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती त्या दोन खेळाडूंचे आयपीएलमधील भविष्य अंधारात आहे. सिक्सर किंग युवारज सिंग आणि गौतम गंभीर यांना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांनी रिलीज केले आहे. त्यामुळे त्यांना आता लिलावाला सामोरे जावे लागणार आहे. दोघांचेही वय आणि फॉर्म बघता त्यांच्यात २०१९च्या लिलावात अनसोल्ड राहण्याची टांगती तलवार लटकत आहे. याच संदर्भात भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनीही याचे अशाच प्रकारचे संकेत दिले आहेत. 
संदीप पाटील यांनी लिहिलेल्या लेखात ‘भारतीय स्टार फलंदाजांना त्यांच्या संघांतून बाहेर जावे लागणार आहे हे दुखःद आहे. पण, ही आश्चर्यकारक घटना नाही. युवराज आणि गौतम हे माझे फेव्हरेट खेळाडू आहेत आणि कायम राहतील. पण, जर मी संघाचा मालक असतो तर मलाही या दोघांबद्दल नक्कीच विचार करावा लागला असता. मीही त्यांना संघातून वगळले असते.’
संदीप पाटील यांनी ‘ एखाद्या खेळाडूला संघातून वगळणे ही काही आनंदाची गोष्ट नाही. कोणतीही संघटना, संघमालक, खेळाडू आणि कर्णधार अपयशी होऊ इच्छीत नसतो. एखादा खेळाडू विशिष्ट जागेसाठी निवडला जातो त्यावेळी त्याच्यावर बराच विचार केला जात असतो. संघमालक व्यावसायिक असतात. जे खेळाडू कामगिरी करत नाहीत त्यांना संघातून काढून टाकायला ते मागेपुढे पाहत नाहीत.’ असेही संदीप पटील यांनी आपल्या लेखात लिहीले आहे. 
आता सूर्यास्ताची वेळ आली आहे. युवराज आणि गंभीर या दोन महान खेळाडूंनी आता भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली आहे. अर्थात याबाबतचा निर्णय हा त्यांनाच घ्यायचा आहे. या दोघांनी देशाला आपल्या फलंदाजीतून भरपूर आनंदाचे क्षण दिले आहेत. पण हा खेळ म्हणजे जो शक्तीशाली तोच वाचणार  असा आहे. असेही मत संदीप पाटील यांनी आपल्या लेखातून व्यक्त केले.  

Post a comment

 
Top