0
हुंडय़ासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पिंपरीतील एका डॉक्टर पतीने पत्नी हुंडा आणत नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱयांविरोधतगुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये महिलेचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्या मंडळींनी तिचा हुंडय़ासाठी छळ करायला सुरुवात केली. सातत्याने तिच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. मात्र तरीही पैसे मिळत नसल्याने पतीने महिलेवर घटस्फोटासाठी दबाव टाकला. काही दिवसांपूर्वी ही महिला आजारी पडली होती. याचा फायदा उचलत तिच्या डॉक्टर पतीने तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

 
Top