0
वडील व वडिलांच्या रखेलीसह आजी-आजोबांच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय चिमुकल्या अंजली कृष्णात कोरे (रा. मंत्री कॉलनी) या शाळकरी मुलीने पेटवून घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिची आई अश्विनी †िहने चौघांविरुध्द मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व आपला माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी कृष्णात याच्या रखेलीला अटक केली आहे. पिता व आजी-आजोबाच या चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने संताप व्यक्त होत आहे.
कृष्णात सदाशिव कोरे, आजी शशिकला सदाशिव कोरे, आजोबा सदाशिव बंडू कोरे व कृष्णातची रखेल स्वप्नाली उर्फ माधूरी सुरेश हेगाना या चौघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कृष्णात यास अंजली (12), ऋग्वेद (10) ही दोन अपत्य. चांगल्या पध्दतीने चौकोनी कुटुंब आणि संसार सुरु असतानाच कृष्णातने 8 ते 9 वर्षांपासून स्वप्नाली हिला रखेल म्हणून ठेवले. कोरे यांचे मूळ घर आष्टानाका येथे आहे. तर कृष्णात हा रखेली स्वप्नाली हिच्यासह मंत्री कॉलनीत येथे राहत होता.
कृष्णात हा अधून-मधून आष्टानाका येथील घरी येवून पत्नी, आश्विनी हिच्याशी भांडण करुन मुलांना जबरदस्तीने मंत्री कॉलनीतील घराकडे घेवून जात होता. त्या†िठकाणी रखेल स्वप्नाली ही अंजली हिला त्रास देत होती. तिला घरातील साफसफाई, धुणी-भांडी व शौचालय-बाथरुमची साफसफाई करण्यास लावत होती. आई आश्विनी ज्यावेळी अंजलीला शाळेत भेटण्यास जात असे, त्यावेळी ही चिमुकली वडील व स्वप्नाली हेगाना हिच्याकडून होणाऱया त्रासाची माहिती देत होती. पण, सासू-सासरेही तिच्या पाठीशी नसल्याने तिचे काहीच चालत नव्हते. अंजली ही आष्टानाका येथील घरी आल्यानंतर आजोबा सदाशिव व आजी-शशिकला हे देखील तिला धुणी-भांडी करायला लावत होते.
15 दिवसांपूर्वी कृष्णात कोरे याने आष्टानाका येथील घरी जावून पत्नी अश्विनी †िहला मारहाण करुन ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून एक लाख रुपये घेवून ये, असे म्हणून घरातून बाहेर काढले होते. त्यावेळी सासू व सासऱयानेही पैसे घेवून ये, नाही तर ठार मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून आश्विनी माहेरी तळसंदे, ता. हातकणंगले येथे गेली. तर कृष्णात हा दोन्ही मुलांना घेवून मंत्री कॉलनीत गेला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी या सर्वांच्या त्रासाला कंटाळून चिमुकल्या अंजलीने आपली जीवनयात्रा संपवली. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास माहेरी असणाऱया अश्विनीला फोनवरुन मुलगी अंजली गंभीर आजारी असल्याचा निरोप पोहोचला. ती आई-वडील, भाऊ व अन्य चार-पाच लोकांसह तळसंदे हून इस्लामपूरला आली. त्यावेळी मुलीने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तिला धक्का बसला.
अंजलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातून उत्तरीय तपासणीनंतर आष्टानाका येथील घरी आणण्यात आला. त्यावेळी आई अश्विनी ही मृत मुलीस पाहण्यास गेली. त्यावेळी सर्वांनीच तिला मज्जाव केला. त्यातून वादावादी होवून अश्विनी †िहचे आई-वडील व भावास मारहाण करण्यात आली. दरम्यान, जमलेल्या लोकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ती आई-वडिलांसह माहेरी गेली. बुधवारी तिने इस्लामपूर पोलीस ठाण्यात येवून पती, त्याची रखेल, सासू व सासऱयाविरुध्द वर्दी दिली. पोलिसांनी अंजलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व अश्विनी हिच्या छळ प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे करीत आहेत.

Post a Comment

 
Top