0
गेले काही दिवसांपूर्वी पेट्रोलने नव्वदी पार केल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. साताऱयातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने रेणुका पेट्रोल पंपासमोरच आंदोलन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दराची घसरण सुरु असून सातारकरांनीही त्या दराचे स्वागत केले आहे. अजूनही दर कमी करावेत, असा सूर सातारकरांमधून उमटू लागला आहे.
साताऱयात इंधनाच्या दरवाढीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलने केली होती. त्या विरोधात सोशल मीडियावरही चांगलेच रान तापले होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर कमी होवू लागले असून आता मात्र सोशल मीडियावर चकार शब्दही नाहीत. साताऱयातील पेट्रोल पंपावरही दर कमी झाले असून पेट्रोल भरताना नागरिकांच्या तोंडावर हसू दिसत आहे.
 

Post a Comment

 
Top