0
केर्ली माध्यमिक विद्यालय केर्लीची विद्यार्थीनी प्रेरणा पांडुरंग पोतदार हिची राज्य रग्बी संघामध्ये सतरा वर्षाखालील संघात निवड झाली आहे.
करवीर तालुक्मयातील केर्ली माध्यमिक विद्यालय केर्लीची विद्यार्थीनी प्रेरणा पांडुरंग पोतदार हिची राज्य शालेय रग्बी संघामध्ये सतरा वर्षाखालील संघात निवड झाली. ती नववीच्या वर्गात शिकत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली यांच्यावतीने ही स्पर्धा सांगली येथे घेण्यात आली. यावेळी प्रेरणाने उत्कृ÷ खेळ करुन संघाला विभागीय स्पर्धेत विजय मिळवून दिला होता. तिच्या या खेळाची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगलीचे क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी तिला राज्य शालेय रग्बी संघामध्ये निवडीचे पत्र दिले आहे.
 दरम्यान सदर स्पर्धा 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. तिला संस्थाध्यक्ष बाबासाहेब चौगले, सचिव मोहन पाटील, दीपक पाटील, मुख्याध्यापक अरुण भोसले, क्रीडा शिक्षक आर. बी. पाटील, जिल्हा रग्बी असोसिएशनचे सचिव दीपक पाटील व पालक पांडुरंग पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.केर्ली माध्यमिक विद्यालय केर्लीची विद्यार्थीनी प्रेरणा पांडुरंग पोतदार हिची राज्य रग्बी संघामध्ये सतरा वर्षाखालील संघात निवड झाली आहे.
करवीर तालुक्मयातील केर्ली माध्यमिक विद्यालय केर्लीची विद्यार्थीनी प्रेरणा पांडुरंग पोतदार हिची राज्य शालेय रग्बी संघामध्ये सतरा वर्षाखालील संघात निवड झाली. ती नववीच्या वर्गात शिकत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली यांच्यावतीने ही स्पर्धा सांगली येथे घेण्यात आली. यावेळी प्रेरणाने उत्कृ÷ खेळ करुन संघाला विभागीय स्पर्धेत विजय मिळवून दिला होता. तिच्या या खेळाची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगलीचे क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी तिला राज्य शालेय रग्बी संघामध्ये निवडीचे पत्र दिले आहे.
 दरम्यान सदर स्पर्धा 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. तिला संस्थाध्यक्ष बाबासाहेब चौगले, सचिव मोहन पाटील, दीपक पाटील, मुख्याध्यापक अरुण भोसले, क्रीडा शिक्षक आर. बी. पाटील, जिल्हा रग्बी असोसिएशनचे सचिव दीपक पाटील व पालक पांडुरंग पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

Top