0
वैद्य अविनाश किसनराव काशीद यांना स्वातंत्र्यसेनानी हुतात्मावीर भाई कोतवाल राज्यस्तरीय नाभिक गुणगौरव पुरस्काराने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते व नाभिक समाज फाऊंडेशन अध्यक्ष नरेशजी गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले. नाभिक समाज फाऊंडेशन, मुंबई यांच्या सौजन्याने विष्णुदास भावे नाटय़गृह नवी मुंबई  येथे ‘नाभिक सन्मान सोहळा’ या सन्मान सोहळय़ात हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.
   यावेळी महानगरपालिका स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनिल पंडित, उपायुक्त सुभाष गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया व्यक्तींचा फाऊंडेशनतर्फे कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई, कोकण विभागातून हजारो समाजबांधव उपस्थित होते. यापूर्वीही महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ व राष्ट्रीय नाभिक महासंघाच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.   
विविध कार्यात अग्रेसर व्यक्तीमत्व                  
  वैद्य अविनाश काशीद हे श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्रचे अध्यक्ष, राज्य सरचिटणीस अखिल भारतीय ओबीसी महासभा, सचिव मनशक्ती योग आयुर्वेद निसर्गोपचार सेवा प्रतिष्ठान पुणे, आजीव सदस्य स्मार्ट उद्योजक ग्रुप महाराष्ट्र, आयएनओ नवी दिल्ली, संपर्क प्रमुख नाभिक समाज, अशा विविध संस्था-संघटना यावरती कार्यरत असून त्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, गरजू रुग्णासांठी वैद्यकीय सहाय्यता, महाअवयवदान जनजागृती, कॅन्सर, मधुमेह जागरुकता अभियान, विषमुक्त अन्नपदार्थ निर्मिती, सेंद्रीय शेती प्रचार व प्रसार, महिला सबलीकरण, प्लास्टीक बंदीअंतर्गत मोफत कापडी पिशवी वाटप अशाप्रकारे सामाजिक, वैद्यकीय व कृषी या विविध क्षेत्रात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन नाभिक समाज फाऊंडेशनतर्फे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  पुरस्काराबद्दल त्यांचे अंकुशदादा बिडवे, राज्य उपाध्यक्ष सचिन आवटे, डॉ. शंकर माने, सचिन पाटील, श्रीकांत देशमुख, डी. टी. पवार आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

 
Top