0
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक पटलावर सादर केले. कोणत्याही चर्चेविना मराठा आरक्षण विधेयक एकमताने थेट मंजूर करण्यात आले. काँग्रेससह राष्ट्रवादीने विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानले आहेत. आरक्षण विधेयक मंजूर होताच भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी फेटे बांधून सेलिब्रेशन केले. मिठाई भरवून एमकेकांना अभिनंदन करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी शिवरायांचे दर्शन घेतले.
औरंगाबादेतही जल्लोषाची तयारी..
भाजपतर्फे औरंगाबादेत जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयावर आरक्षणाचा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जल्लोषात सहभागी होणार आहे. पेढे आणि ताशाचा गजरात जल्लोष सुरु झाला आहे.
अहवालात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे बहुचर्चित राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा आरक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडून त्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती.
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतुद केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळणार हे निश्चित झाले आहे. एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार असून ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावला जाणार नाही.
दरम्यान, मराठा आरक्षण विधेयकाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ उपसमितीची पाचवी बैठक बुधवारी रात्री विधानभवनात पार पडली. या बैठकीत आधी एटीआर सादर करण्याचा व त्यानंतर विधेयक मांडण्यावर चर्चा करण्यात आली. हे विधेयक एकमताने मंजूर करण्याचेही सरकारचे प्रयत्न आहेत. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यावर उपसमितीत एकमत असल्याचे उपसमितीचे सदस्य ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.Maratha Reservation live update celebration bjp mlas after report chief minister

Post a Comment

 
Top