0
मुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्याची संपूर्ण घटना राज्य सरकारने एखादा इव्हेंट वाटावा अशी साजरी केली. आरक्षणाच्या विधेयकावेळी दोन्ही सभागृहात सत्ताधारी भाजप-शिवसेना आमदारांनी भगवे फेटे बांधत जल्लोष केला. याच मुद्द्यावर माजी अजित पवार यांनी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. आम्हालाही फेटे बांधता आले असते. पण ही जल्लोषाची वेळ नाही. कारण या आरक्षणासाठी आमच्या अनेक बांधवांनी प्राणांचे बलिदान दिले आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

विधीमंडळामध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर अजित पवार यांनी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली. याठिकाणी बोलाताना अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आम्हालाही आहे. पण ज्या 40 हून अधिक बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांच्या घरांमध्ये कालची दिवाळी साजरी झाली नाही. त्यांची पोरं बाळं उघड्यावर आली आहेत. या परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही जल्लोष करणार नाही असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

श्रेय घेण्याची वेळ नाही 
यावेळी सरकारवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, आरक्षणाचा जल्लोष करण्याच्या आधी आरक्षणाची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडायला हवी. ही काही श्रेय घेण्याची वेळ नाही, तुम्ही फक्त तुमची जबाबदारी पार पाडली आहे. अशा परिस्थितीतही राजकीय पक्ष स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, असे पवार म्हणाले.Ajit Pawar criticized Bjp Shivsena MLAs for celebration over Maratha Reservation

Post a Comment

 
Top