0
इंदापुर तालुक्यातील नामांकित सहकारी साखर कारखाना छत्रपतीच्या नुतन चेअरमनला घरातच गोळी लागल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांनी कारभार हाती घेतला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू सहकारी होते. या घटनेने इंदापुर तालुक्यातील राजकारण्यांना धक्का बसला आहे. 
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यांच्या कुटुंबियांनी ते पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी उडाल्याचा दावा केला आहे. पोलीस हा दावा तपासून घेत आहेत. 
राज्यातील साखर कारखानादीर अग्रेसर समजल्या जाणाऱया छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप निंबाळकर यांची 31 ऑक्टोबर रोजीच बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या निवडीनंतर जेसीबीने गुलाल उधळून आंनदोत्सव साजरा करण्यात आला होता. परंतु, निवडीनंतर पाचच दिवसांत त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह इंदापूर व बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. 
छत्रपती कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू होता. या कामगारांशी बैठक घेऊ निंबाळकर यांना हा संप आजच मिटविला. परंतु, कामगारांना बोनस देण्याच्या मुद्यावर काही संचालकांचे कार्यकारी संचालकांशी मतभेद झाले होते. त्यामुळे निंबाळकर तणावात होते. कारखान्यापासून त्यांचे घर दोन किलोमीटर अंतरावर आहे. ते दुपारी अडीचच्या सुमारास स्वतःच्या घरात वरच्या मजल्यावर होते. इतर कुटुंबीय खालच्या मजल्यावर होते. त्यांच्याकडे स्वतःचे पिस्तूल होते. या पिस्तूलातून त्यांनी स्वतःच्या छातीत गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय वर पळाले. तेव्हा निंबाळकर रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यांना तातडीने बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, वडील, एक मुलगा, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.
 

Post a Comment

 
Top