0
 • मुंबई - शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजप दबाव टाकत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख हे एकला चलो रे या आपल्या भूमिकेला अनुसरून गुरुवारपासून लोकसभेचे रणशिंग फुंकण्यास सज्ज झाले आहेत. गुरुवारी मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रथम रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार महाड येथील भिलारे मैदानात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जागा शिवसेनेची असून अनंत गिते येथून खासदार आहेत. केंद्रात ते मंत्रिपदावरही आहेत. दुसरी सभा मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील पोलिस मैदानावर दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत.


  शिवसेनेतील सूत्रांनी माहिती देताना सांगितले, भाजपने युतीसाठी कितीही विनवण्या केल्या तरी उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होणार नाहीत. भाजपने मागील विधानसभेच्या वेळेला केलेली दगाबाजी आम्ही विसरू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सर्वच्या सर्व म्हणजे ४८ मतदारसंघात उमेदवार दिले जाणार आहेत. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार सक्षम नसेल तेथे पर्याय शोधला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. ५०-५० टक्के जागा भाजपने दिल्या तर शिवसेना युतीसाठी तयार होईल का, असा प्रश्न शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला विचारला असता त्यांनी सांगितले, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. मात्र, मागील अपमान आम्ही विसरणार नाही.

  ४८ मतदारसंघात सभा घोणर : मुख्यमंत्री
  दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ४८ लोकसभा मतदारसंघात सभा घेणार असल्याचे सांगितले. एकीकडे युती व्हावी असे बोलतात आणि दुसरीकडे सर्व लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार, असे कसे असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले, मागील वेळी युती असतानाही मी दौरे केले होते तसेच आत्ताही करणार आहे. युती झाली तर दोघांनाही फायदा होईल त्यामुळे मी सर्व लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार त्यात नवीन आणि वेगळे काही नाही असे स्पष्ट केले. दरम्यान, यामुळे भाजप व शिवसेनेत नव्याने संघर्ष होण्याची शक्यता आहे.
  ५०-५० वर जागा वाटप होऊ शकते ? 
  शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेत लोकसभा निवडणुकीची सविस्तर चर्चा झाली आणि त्याचे प्राथमिक नियोजनही करण्यात आले होते. भाजपबरोबर शिवसेनेची युती ५०-५० टक्के जागा वाटपावर होऊ शकते. आता ज्या जागा ज्या पक्षाने जिंकल्या आहेत त्या त्यांच्याकडेच ठेवून शिवसेना जेथे दुसऱ्या क्रमांकावर होती त्या जागा शिवसेनेला दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव भाजपला दिला जाThe trumpet of the Lok Sabha in the state will blow Uddh to this day
 • णार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Post a Comment

 
Top