0
सबेन
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गाबावरील खेळपट्टीवर हिरवे गवत असल्याने विराट कोहलीने हा निर्णय घेतला असावा. याचबरोबर भारतीय संघाचा धावांचा पाठलाग करण्यात हातखंडा आहे.  
प्रथम गोलंदाजी करताना भारताने पहिल्या दोन षटकात कांगारुंना फक्त ५ धावा करु दिल्या. याचमुळे कांगारुंचा कर्णधार ॲरोन फिंचने आक्रमक फटका मरण्याच्या नादात चेंडू हवेत मारला. पण, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटने हा हातातला झेल सोडला. विराटने झेल सोडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. फिंचसारख्या स्फोटक फलंदाजांला जीवन दान देणे भारताला महागात पडणार असे वाटत असतानाच खलील अहमदने चौथ्या षटकात कांगारूंना आरसी शॉर्टच्या रुपाने पहिला धक्का दिला.
भारताचा हा ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी मिळवण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शॉर्ट बाद झाल्यावर आलेल्या क्रिस लेन आणि फिंचने आक्रमक फलंदाजी करत कांगारुंचे अर्धशतक धावफलकावर लावले. ही आक्रमक जोडी भारताला दमवणार असे वाटत असतानाच कुलदीप यादवने फिंचला बाद करत भारताला पर्यायाने झेल सोडणाऱ्या विराटला मोठा दिलासा दिला.  
ऑस्ट्रेलियाच्या जरी ठराविक अंतरांनी विकेट पडत असल्या तरी त्यांनी आक्रमक फलंदाजी करत धावगती चांगली राखली हती. पण, आल्यापासूनच आक्रमक फलंदाजी करत असलेल्या लिनला कुलदीप यादवने बाद करत धावगतीला ब्रेक लावला लिनने २० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यात तब्बल ४ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. 

Post a comment

 
Top