0
 • T20 World Cup from 9 Novemberगुयाना दिवाळीच्या जल्लाेषात वनडे वर्ल्डकपमधील उपविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ अाता विजयाचा धमाका उडवताना दिसणार अाहे. येत्या ९ नाेव्हेंबरपासून विंडीजमध्ये महिलांच्या टी-२० विश्वचषकाला सुरुवात हाेईल. भारताच्या महिलांना या स्पर्धेत किताब जिंकण्याच्या अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी अाहे. भारताचा सलामी सामना न्यूझीलंडशी हाेईल. हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला संघ या स्पर्धेत अापले काैशल्यपणास लावणार अाहे. महिलांचा हा वर्ल्डकप विंडीजमध्ये ९ ते २५ नाेव्हेंबरदरम्यान विंडीजमध्ये अायाेजित कररण्यात अाला. अाता हा वर्ल्डकप जिंकण्याचा मानस असल्याचे कर्णधार हरमनप्रीतने सांगितले. या स्पर्धेसाठी नुकताच भारताचा महिला संघ विंडीजला रवाना झाला. या स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न असेल. यावर सर्वांची नजर असेल.

  वर्ल्डकपमध्ये महिलांचे चार संघ किताबाचे प्रबळ दावेदार 
  भारताच्या महिला संघाला अाता किताबाचे प्रबळ दावेदार मानले जाते. कारण, सत्रातील भारताच्या महिलांची टी-२० मधील कामगिरी काैतुकास्पद ठरली अाहे. यामुळे भारताचा दावा मजबूत अाहे. यात अाॅस्ट्रेलिया,इंग्लंड, अाणि अाफ्रिका संघही दावेदार अाहेत. तसेच अ गटात यजमान विंडीजसह इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण अाफ्रिका अाणि बांगलादेशचा समावेश अाहे. या वर्ल्डकपमध्ये महिलांचे दहा संघ सहभागी झाले.
  भारतीय महिला अाता वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न साकारणार 
  भारताने गतवर्षी वनडे वर्ल्डकपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे संघाला विजयी माेहीम कायम ठेवताना फायनलचा पल्लाही गाठता अाला हाेता. मात्र, अंतिम सामन्यात इंग्लंडकडून टीमला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचा संघ उपविजेता ठरला. अाता वर्ल्डकप जिंकण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्याची भारताच्या महिलांना संधी अाहे.
  ११ नाेव्हेंबरला भारत-पाक यांच्यात रंगणार मिनी फायनल
  कट्टर प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान यांच्यात गटातील पहिला सामना ११ नाेव्हेंबर राेजी हाेईल. हे दाेन्ही संघ गुयानाच्या मैदानावर समाेरासमाेर असतील. महिलांच्याही वर्ल्डकपमध्ये चाहत्यांची नजर या सामन्यावर असेल. या सामन्यात सरस खेळी करण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल. यंदाच्या स्पर्धेतील अाणि ब गटातील या दाेन्ही संघातील हा पहिलाच सामना असेल. तसेच भारताचा गटातील हा दुसरा सामना असेल. या सामन्यात बाजी मारण्याचा महिला संघाचा मानस कर्णधाराने व्यक्त केला. याच संधीचे साेने करण्याचा मानस असल्याचे कर्णधार हरमनप्रीतने सांगितले. या स्पर्धेसाठी नुकताच भारताचा महिला संघ विंडीजला रवाना झाला.
  महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृतीकडून माेठी अाशा! 
  वनडेपाठाेपाठ अाता अाता टी-२० च्या विश्वचषकातही भारताकडून अव्वल कामगिरी करण्याचा सांगलीच्या युवा फलंदाज स्मृतीचा प्रयत्न असेल. यासाठी अापण कसून सराव केल्याचेही तिने सांगितले. तिची गतवर्षीच्या वर्ल्डकपमधील कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे अाता तिच्याकडून पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे. तिच्यावर टीमच्या विजयाची मदार असेल. तिने सत्रातील या छाेट्या फाॅरमॅटच्या सामन्यातही वेळाेवेळी सरस खेळी केली अाहे.
  भारताचे स्पर्धेतील सामने 
  ९ नाेव्हेंबर न्यूझीलंडविरुद्ध 
  ११ नाेव्हेंबर पाकिस्तानविरुद्ध 
  १५ नाेव्हेंबर अायर्लंडविरुद्ध 
  १७ नाेव्हेंबर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध 
  २२ नाेव्हेंबर पहिला उपांत्य सामना
  दुसरा उपांत्य सामना 
  २५ नाेव्हेंबर फायनल 
  १० महिला संघ सहभागी

Post a Comment

 
Top