0
पैठण - जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने ८.९९ टीएमसी पाणी दारणा, मुळा, प्रवरासंगममधून सोडण्यात आले होते. या पैकी साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असताना केवळ ३.३१ टीएमसीच पाणी जायकवाडीत आले असून आणखी दोन टीएमसी अपेक्षित पाण्याचा हिशेब लागत नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी काही बोलण्यास तयार नसल्याने जायकवाडीच्या समन्यायी पाण्यावर पश्चिम महाराष्ट्राने आपल्या भागातील तलाव भरून घेतले असल्याचे समोर येत आहे.


सध्या जायकवाडी धरणात ३२ टक्के पाणीसाठा असून हे पाणी औरंगाबाद, जालना जिल्ह्याला वर्षभर पिण्यासाठी पुरेल, मात्र जायकवाडी धरणाच्या वरील धरणांचा पाणीसाठाही कमी असल्याने व समन्यायीप्रमाणे आता जायकवाडीतून माजलगाव,परळीला पाणी द्यावे लागणार असल्याने जायकवाडीत जे साडेतीन टीएमसी पाणी आले त्याचा फायदा औरंगाबादला कमी व इतरांना जास्त होत असतानाच समन्यायी पाण्याचा काही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील औरंगाबाद जालन्यासह चार उद्योग, नगर जिल्ह्यातील अनेक भागाला पाणीपुरवठा होतो.


जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मागील दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच शंभर टक्के झाला होता. त्यावर शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाने दगा दिल्याने जायकवाडी यंदा भरले नाही. त्यात समन्यायी पाणी सोडले ते ही कमी आल्याने मारवाड्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. जायकवाडीत जे समन्यायी पद्धतीने पाणी सोडले ते बुधवार, दि. ७ लाच बंद झाले. यात नंतर जे पाण्याचा फ्लो सुरू होता आता तो ही बंद झाला असून आहे ते पाणी पिण्यासाठी वापरावे लागणार आहे.

उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी वर्षभर पुरेल
जायकवाडीचा पाणीसाठा ३२ टक्क्यांहून अधिक आहे. केवळ पिण्यासाठी हे पाणी वर्षभर पुरेल. समन्यायी पाणी अपेक्षित आले नाही, नदी पात्रातील खड्डे व इतरत्र पाणी गेले का हे पाहावे लागणार आहे.
- अशोक चव्हाण, 
शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

सोडलेले पाणी अडवल्याचा मराठवाड्याला बसला फटका
जायकवाडीत आणखी भंडारदराचे दोन टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे, तरी आले ते पाणी कमीच आले आहे. वरील भागांत पाणी अडवल्याचा हा फटका बसला असून भंडारदराचे पाणी कधी सोडणार, ते किती येईल यावर जायकवाडी समन्यायी पद्धतीच्या पाण्याचा हिशेब होईल. आले ते पाणी पिण्यासाठी राखीव असणार आहे.
- संजय भर्गोदेव, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग

जायकवाडीतून बिगर सिंचन पाणीपुरवठा 
-दरवर्षी ३२७ दशलक्ष घनमीटर 
- पिण्यासाठी १०५ दशलक्ष घनमीटर 
- औद्योगिक वसाहती ३४ दशलक्ष घनमीटर 
- परळी पावर प्लँट १८८ दशलक्ष घनमीटर 
- एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा 
- दररोज ५०.५ एमएलडी 
- वाळूज एमआयडीसी ३५ एमएलडी 
-चिकलठाणा ८ एमएलडी 
-शेंद्रा एमआयडीसी ५.२५ एमएलडी 
-जालना एमआयडीसी ०.८० एमएलडीFive dams would come from 8.99 TMC water, 3.31 out of which, where did the rest water?

Post a Comment

 
Top