0
प्रधानंमत्री आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी या योजनेतून ज्यांना घर नाही. त्यांना हक्काचे घर देण्याकरता शासन अग्रही आहे. सातारा जिह्यातील या योजनेच्या माध्यमातून 2016 ते 2019 या दरम्यान 14 हजार 393 घरकुलांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 11 हजार 914 घरकुले मंजूर झाली. त्यातील 8 हजार 89 घरकुले बांधून पूर्ण झाली. त्यापैकी 3 हजार 49 घरकुले अपूर्ण राहिली आहेत. जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा 75 लाभार्थ्यांना मिळण्याबाबत ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली. 

Post a comment

 
Top